मराठा आरक्षण : दुखणे खरे आहे, पण उपाय चुकतोय... मराठे, इतर मागास वर्गीय समूह एकाच जात्यात दळले जात आहेत
केवळ आरक्षणाने पुढील पिढ्या सुखी होतील ही मांडणी दिशाभूल करणारी आहे. आरक्षणाच्या जोडीने इतर बऱ्याच विषयांवर काम करणे आवश्यक आहे. याचा नीट विचार होणे आवश्यक आहे. जरांगे पाटलांच्या भोवती आता लोक उभे राहत असतील, तरी हा प्रश्न त्यांच्या एकट्याने सुटणारा नाही. शिवाय, हा प्रश्न निव्वळ मराठ्यांचा नाहीये. मराठा, ओबीसी, दलित, आदिवासी, सगळ्यांनाच याची झळ बसते.......